सुविचार

सुविचार संग्रह

सुविचार यादी


सुविचार 1 :
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

सुविचार 2:
दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

सुविचार 3:
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.

सुविचार 4:
आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.

सुविचार 5:
अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

सुविचार 6:
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

सुविचार 7:
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

सुविचार 8:
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

सुविचार 9:
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

सुविचार 10:
गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.

सुविचार 11:
इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

सुविचार 12:
अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.

सुविचार 13:
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

सुविचार 14:
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

सुविचार 15:
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

सुविचार 17:
संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.

सुविचार 18:
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

सुविचार 19:
“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”

सुविचार 20:
“नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”

सुविचार 21:
“विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”

सुविचार 22:
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

सुविचार 23:
अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

सुविचार 24:
आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

सुविचार 25:
काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मारून जातात
पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते.

सुविचार 26:
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

सुविचार 27:
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..

सुविचार 28:
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

सुविचार 29:
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.

सुविचार 30:
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..

No comments:

Post a Comment